Home » महाराष्ट्रात गोवरचा कहर, मुंबईत तब्बल 8 बालकांचा मृत्यू, राज्यात 1259 संशयित

महाराष्ट्रात गोवरचा कहर, मुंबईत तब्बल 8 बालकांचा मृत्यू, राज्यात 1259 संशयित

राज्यातून कोरोना हद्दपार झाल्याची परिस्थिती असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. राज्यात गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढलीय. विशेष म्हणजे गोवरचा संसर्गाचा वेग पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या आजाराच्या संसर्गाची दखल घ्यावी लागलीय. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आतापर्यंत तब्बल 8 रुग्णांचा गोवरमुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.राज्यात आतापर्यंत गोवरचे 1259 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 164 रुग्णांचं निदान झालंय. मुंबईत 8 रुग्णांचा गोवरने मृत्यू झालाय. त्यापैकी एका बालकाने गोवरची लस घेतली होती. इतरांच्या लसीची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.आरोग्य विभागाचं राज्यातील संवेदनशील भागावर विशेष लक्ष आहे. गोवर लस न घेतलेल्या 5 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.गोवरचा वाढता प्रादूर्भाव पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोवर संदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली. गोवरचा होत असलेल्या प्रसारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *