कोतुळ परिसरातील बलात्कारातील गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता
अकोले ;- कोतुळ परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लैंगिक संबंधातून चार महिन्यांची गरोदर ठेवलेल्या आरोपीची संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

कोतुळ परिसरातील सचिन बाळू भवारी याने प्रेम प्रकरणातून गावातीलच एका अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवले होते.या लैंगिक संबंधामुळे पीडिता ही चार महिन्यांची गरोदर होती.त्यामुळे अकोले पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्यांतर्गत 5 ऑगस्ट 2020 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अकोले पोलिसांनी यावेळी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली होती.सुमारे अडीच वर्षे हा खटला संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता.

आरोपी सचिन भवारी याचे वकील निखिल वाकचौरे यांनी न्यायालयात आरोपीची भक्कमपणे बाजू मांडीत घडलेल्या प्रकरणाचा कोर्टात उलगडा केला.विशेष म्हणजे या घटनेतील पीडितेचे अन आरोपीचे गरोदर पणातील डीएनए चाचणीचे नमुने मॅच झाले होते.हे सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात असताना ही वकील निखिल वाकचौरे यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन युक्तिवाद केला.त्यामुळे संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय प्रशांत कुलकर्णी साहेब यांनी आरोपी सचिन भवारी याची आज निर्दोष मुक्तता केलीय.दरम्यान या घटनेतील आरोपीची पोक्सो या गंभीर गुन्ह्यातून आश्चर्यकारकरित्या निर्दोष मुक्तता झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत……….!
अकोले टाईम्ससाठी वृत्त संकलन विभाग संगमनेर