तो मद्यधुंद खाजगी सावकार रात्रीच का लिहितो ?
अकोले टाईम्स समूहातील सर्व सदस्यांना नमस्कार,खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून एक मद्यधुंद इसम रात्रीच्या वेळी आपल्या ग्रुपवर अनेक कमेंट करीत आहे.रात्री कमेंट करणाऱ्याला उत्तर देऊन आपण आपली पात्रता कशाला कमी करायची म्हणून त्याला उत्तर काही दिले नाही.
मात्र रात्रीपासून अनेक आपल्या समूहातील सदस्यांनी मला पर्सनल मेसेज करून सांगितले त्यास ग्रुपमधून काढा व त्याला तुम्ही उत्तर द्या.त्यामुळे या सदस्यांच्या आग्रहास्तव आज मी हे उत्तर त्यास देत आहे.ग्रुप सदस्यांना मी सांगू इच्छितो की आपण त्या मद्यधुंद इसमाला ग्रुपबाहेर काढणार नाही,तुम्हाला जो त्रास होतोय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
आपल्या ग्रुपवर कमेंट करणारा हा इसम कोणी लायकीवान नसून तो एक खाजगी सावकार आहे.अकोले टाईम्सने गेल्या अनेक दिवसांपासून खाजगी सावकारशाहीचे प्रकरण लावून धरले आहे.या सावकारशाहीतील हा एक वसुली एजंट आहे.तो कोणाची वसुली करतो हे तुम्हाला सांगायची गरज आहे का ? जाऊ द्या सांगूनच टाकतो तो “नवले” नावाच्या इसमाची वसुली करतो.आपण सातत्याने खाजगी सावकारांच्या बातम्या करीत असल्याने तो रात्रीच्या वेळी दारू पितो अन ग्रुपवर कमेंट करतो.तो दारू प्यायला कोणासोबत असतो,कुठे बसतो याची आपण एक स्पेशल मालिका लावणार आहोत,त्या मालिकेचे नाव असेल “गोष्ट पाटावरची पिल्यानंतरची”!
असो सध्या तरी या मद्यधुंद सावकारावर बोलूया,हा सावकार अतिशय नीचवृत्तीचा असून तो पैशांच्या वसुलीसाठी आई बहिणींशी कोणत्या प्रकारे बोलतो,त्याचे एक रेकॉर्डिंग लवकरच तुमच्या मोबाईलवर असेल.त्याने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अकोले टाईम्स कार्यालयात दारूच्या नशेत येऊन कार्यालयाचे फोटो काढले होते.तो व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिलाही असेल.त्यानंतर त्याने एका कार्यालयात माफीनामा ही मागितला.त्या मिटिंगमध्ये त्याला त्याच्या सहकाऱ्यांसमोर कसा प्रसाद मिळाला याचा व्हिडिओ ही लवकर तुम्हाला पाहायला मिळेल.सध्या तरी तो सोनेतारण करून कसे सावकारकी करतो,याची कबुलीच त्याने त्याच्या तोंडून दिली आहे,हा व्हिडीओ मी या लिंकमध्ये टाकला आहे,सध्या हा व्हिडिओ तुम्ही पहा अन आनंद घ्या.
हा घ्या पुरावा खाजगी सावकारकी करीत असल्याचा
हा सावकार फक्त पुढे उभा केलेला बाहुला आहे,त्याच्या पाठीमागे रात्री अपरात्री बसणाऱ्या वेगळ्या शक्ती आहेत,असं मला वाटतंय. राजू आभाळे,वाल्मिक आरोटे,अनिल राक्षे यांच्या आत्महत्यांना जबाबदार असणारी ही सावकारांची एक साखळीच आहे.हा सावकार त्यातील एक कडी आहे.येत्या काही दिवसांत आपण या मद्यधुंद सावकाराने अन त्याच्या नवले नावाच्या सहकाऱ्यांनी उसनवारीच्या केलेल्या नोटऱ्या तुम्हाला वाचायला देणार आहोत.अकोले न्यायालयात कुणाच्या किती चेक बाऊनच्या केसेस आहेत,हे ही तुमच्या समोर येणार आहे.
तूर्तास इतकंच लिहून थांबतो ! रात्री ग्रुपवर लिहिणाऱ्याला मी रात्री कधीच उत्तर देऊ शकत नाही.कारण “रात्री पाप होतात अन दिवसा पुण्य” त्यामुळे मी त्याला दिवसाच उत्तर देईल.ग्रुप सदस्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगीर आहे.त्याने ग्रुपवर काहीही लिहूद्या तरीही आपण त्याला ग्रुप बाहेर काढणार नाही.
अकोले टाईम्सची खाजगी सावकारशाही भूमिका योग्य आहे का अयोग्य ? हे तुम्ही मला नक्की कळवा,तुमच्या मतांचा आदर केला जाईल.
श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स