राजकारण

पुण्यात भाजमध्ये अंतर्गत धुसफूस? आमदाराची भर मंचावरुन जाहीरपणे नाराजी व्यक्त

पुण्यात भाजप आमदाराने भर मंचावरुन आपली जाहीर नाराजी व्यक्त केलीय. आपल्याला बोलू दिलं जात नाही, असा आरोपच त्यांनी केलाय.

भाजप आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांची मंचावरून जाहीर नाराजी व्यक्त केलीय. आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात बोलू दिलं जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आज कुठेतरी बोलू दिलं, असं म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावलाय. पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर लिखीत पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या संकल्पनेतून ‘धडाकेबाज लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. यावेळी आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मला आज बोलण्याची संधी दिली. कोणी नाही म्हणून कोणालातरी बोलायला उभं केलं पाहिजे म्हणून मला उभं केलं. आणि मी पण समजून गेलो, चला आता कोणी नाही तर मी आहे कुठं तरी बोललं पाहिजे म्हणून आपली सुरवात केली, असं आमदार भीमराव तापकीर म्हणाले

“मी बोलेन तोपर्यंत कोणीतरी नेता येईल आणि पुढे बोलेल मी त्या अनुषंगानेच बोलत होते. मला नेमका बाहेर आवाज आला आणि कळलं आता आपण आपलं भाषण आवरतं घ्यावं”, असं तापकीर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!