भानुदास तिकांडे यांनी लिहिला स्वतःच्याच हाताने राजीनामा !

अकोले ;- अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे हे पक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याच्या चर्चेनंतर अकोले तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी स्वतःच्या हाताने आपल्या पदासह इतर कार्यकारिणीचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना लिहिला होता.या झालेल्या बैठकीत आ.किरण लहामटे यांच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले.
  
हा राजीनामा स्वतः तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिला आहे

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””


               

मात्र काही माध्यमांमध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर माजी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी आपली बाजू सावरून घेत पुन्हा प्रेसनोट काढण्याची वेळ आली.विशेष म्हणजे या प्रेसनोटमध्ये आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या भानुदास तिकांडे यांनी आपला उल्लेख पुन्हा तालुकाध्यक्ष म्हणून केला आहे.त्यामुळे कुठे तरी आ.डॉ.किरण लहामटे यांना भिती किंवा त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्यासाठी हे राजीनामा सत्र झाले असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.तुमचा राजीनामा अद्याप स्वीकारला की नाही हे माध्यमांना माहीत नाही.मात्र तुम्ही राजीनामा देऊन ही पुन्हा प्रसिद्धी पत्रकात स्वतःचा उल्लेख तालुकाध्यक्ष म्हणून करता तेव्हा दाल मे कुछ काला है असेच वाटते.

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

भानुदास तिकांडे यांनी काढलेली प्रेसनोट (जशीच्या तशी)

प्रेसनोट
मी भानुदास बोल्हाजी तिकांडे,
रा.अकोले.ता.अकोले गेली तिन चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोले पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारीत होत आहेत.त्याबाबतीत मी तालुका अध्यक्ष म्हणुन खुलासा करतो की दिनांक 12/01/2023 रोजी मा. आमदार डाॅ.किरण लहामटे साहेब यांचे संपर्क कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत सभासद नोंदणी, पक्षाकडून आलेल्या विविध विषयांवर चर्चा आणि ऐनवेळेस विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः आतापर्यंत झालेल्या निवडणूकांच्या कामावर चर्चा झाली. यात काही निवडणूकीत आलेले अपयश यावर चर्चा झाली. माध्यमातून येणाऱ्या बातम्या मध्ये पदाधिकारी मा.आमदार महोदयांवर नाराज असल्याच्या बातम्या प्रसारीत होत आहे,आमदार डाॅ.किरण लहामटे हे आमच्या पक्षाच्या नेते असुन आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत माञ जाणीवपूर्वक आमदार लहामटे व आमच्या पदाधिकारी यांना बदनाम करण्याच्या हेतूने ही बातमी प्रसारित करण्यात आली नाही.या बातमीशी माझा व अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांचा कोणता ही सबंध केला नाही. आपण सर्वांनीच या निवडणूकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत अशीही चर्चा झाली व याबाबत दुसर्‍या दिवशी नेते मंडळी बरोबर चर्चा करून माध्यमांना कळविण्यात येईल असे ठरले होते. मात्र दुर्दैवाने त्याच दिवशी मा. लोकनेते अशोकराव भांगरे साहेब यांचे निधन झाल्याने दुसर्‍या दिवशी खुलासा करता आला नाही.आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या मध्ये कोणताही गैरसमज पसरवू नये हि विनंती.
आपला
श्री.भानुदास बोल्हाजी तिकांडे
राष्ट्रवादी काँग्रेस अकोले,तालुका

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

आ.किरण लहामटे यांच्यावर अशा प्रकारची करण्यात आली टीका 

गुरुवार दि.12 जानेवारी रोजी अकोले तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आ.डॉ.किरण लहामटे यांच्यावर चौफेर टीका टिपण्णी करण्यात आली.
आम्हाला पक्षीय पदाधिकारी म्हणून कधीही विश्वासात घेतले जात नाही,विकासकामे करताना विचारले नाही,अकोले तालुक्यात इतका मोठा विकासनिधी आणला मात्र पक्षाच्या एका ही नेत्याला उदघाटनाला बोलावले जात नाही,आमदार महोदय पक्षीय पदाधिकाऱ्यांशी उद्धटपणे बोलतात,अमृतसागर दुधसंघाची निवडणूक ही पिचड व आपल्या काही नेत्यांची सेटिंग होती,त्यामुळे दुधसंघात आपला पराभव झाला नसून दुधसंघ पिचडांना बहाल करण्यात आला आहे,अशी अनेक वक्तव्ये या बैठकीत करण्यात आली.अन त्या माध्यमातून आ.लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका करण्यात आली.या बैठकीत झालेल्या राजीनामा सत्राची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा !
श्री.भानुदास तिकांडे
श्री.राजेंद्र कुमकर
श्री.बाळासाहेब आवारी
श्री.सोपान शेळके
श्री.विकास बंगाळे
श्री.चंद्रभान नवले सर
श्री.भागवत शेटे
श्री.मकरंद वाकचौरे
श्री.हरिभाऊ अस्वले
श्री.अभिजित वाकचौरे
श्री.विजय देशमुख
श्री.प्रशांत भालेराव
श्री.गणेश कोकणे

राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष रविंद्र मालुंजकर यांनी आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत व्हाट्सअप स्टेटस आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.त्यानंतर अवघ्या एका दिवसातच रवि मालुंजकर याची राष्ट्रवादी पक्षासह तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.आता तर खुद्द आ.लहामटे यांच्या कार्यालयातच बसून त्यांच्याच कारभारावर ताशेरे ओढण्यात आले.विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना लिहिण्यात आलेला राजीनामा हा स्वतः भानुदास तिकांडे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिला आहे.राजीनामा देणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर भानुदास तिकांडे यांचेच नाव आहे.एव्हाना या सर्व प्रकाराची बातमी वर्तमान पत्रात वृत्त छापून आल्याने आमदार लहामटे यांची सर्वत्र बदनामी झाली आहे.त्यामुळे आ.किरण लहामटे येत्या काही दिवसांत तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्यासह संबंधित कार्यकारिणीची हकालपट्टी करणार का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

आ.डॉ.किरण लहामटे साहेब,तुमच्या पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या तीन वर्षातील कामकाजाचे ऑडीट करा,कोणता पदाधिकारी पक्ष बांधणीसाठी झटला या सर्व बाबी तपासून नवीन पदाधिकारी नियुक्ती करा तेव्हा कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मतदारसंघात झालेले दिसेल.

श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *