आमची टीम
आमची टीम
श्री.अमोल शिर्के
संपादक, अकोले टाईम्स

अकोले टाईम्स न्युज चॅनेलचे संपादक अमोल शिर्के हे सन 2011 पासून पत्रकारितेत कार्यरत आहे.अहमदनगर जिल्ह्याचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या दैनिक सार्वमत वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याला सुरुवात झाली.दैनिक सार्वमत अकोले कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी पाच वर्षे यशस्वी काम पाहिले.यानंतर दैनिक पुढारी,दैनिक नायक,दैनिक लोकवेध,दैनिक लोकमंथन यासारख्या वृत्तपत्रात ही त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे.सोशल मीडियाची वाढती व्याप्ती पाहून त्यांनी सन 2017 साली अकोले टाईम्स या न्युज चॅनेलची संयुक्तपणे स्थापना केली.अकोले टाईम्स न्युज चॅनेल हा सद्यस्थितीत अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनेल म्हणून नावारूपाला आला आहे.अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्याने स्वातंत्र्यानंतर प्रतिकुल परिस्थितीतही प्रगती पथाकडे वाटचाल सुरू केली.निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या तालुक्याच्या पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी राजकीय नेतृत्व व सामाजिक संस्था सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत.घाटघर जलविद्युत प्रकल्प,कळसुबाई,हरिश्चंद्रगड,कोकणकडा, अमृतेश्वर,भंडारदरा,निळवंडे धरण या ऐतिहासिक ठिकाणांमुळे अकोले तालुका बहरला आहे.येथील आदिवासी बांधवांना आधुनिक जगाकडे वळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे.अकोले तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वच मातब्बर मंडळी पक्षभेद विसरून सातत्याने पाठपुरावा करीत आहे.या अकोले तालुक्याच्या विकास वाटचालीत अकोले टाईम्स या वेब न्युज चॅनेलचाही खारीचा वाटा राहिला आहे.अकोले टाईम्स परिवारात काम करणारी लोकं ही सामाजिक जाणिवेतून पत्रकारितेचे व्रत अविरतपणे जोपासत आहे.अकोले टाईम्सची सर्व टीम ही उच्चशिक्षित आहे.
स्वतः अकोले टाईम्सचे संपादक अमोल शिर्के हे पदवीधर असून ते फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाले आहेत. पत्रकारितेची पदवी ही त्यांनी प्राप्त केलेली आहे.अकोले टाईम्सच्या माध्यमातून सामाजिक भान राखून आम्ही बातमीदारी करीत आहोत.प्रेक्षकांच्या अन वाचकांच्या अगाध प्रेमामुळे आमची आजपर्यंतची वाटचाल सुखद राहिली.अन भविष्यातही तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर अशीच पडत राहो,जेणेकरून आम्हाला पत्रकारितेचे व्रत जोपासताना आणखी बळ मिळेल.आमच्या युट्युब,फेसबुक,इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा.त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अन सामान्य जनतेचा आवाज बनू.
मा. श्री. ज्ञानेश्वर खुळे
उपसंपादक, अकोले टाईम्स

पत्रकार ज्ञानेश्वर खुळे हे 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.विविध दैनिकांत शेती,सहकार,अर्थकारणाचे परिणाम,प्रासंगिक,पायाभूत सुविधा या विषयांसहित अवैध धंद्यांवरही प्रसंगी बेधडक लिखाण करणारे.लेखणीला साहित्यिक दर्जाची जोड असल्याने गावशिवारासहित राज्यस्तरावरील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण,सविस्तर आणि वाचनीय लिखाण.पत्रकारितेच्या माध्यमातून विषयांचा ठामपणे वास्तवदर्शी पाठपूरावा करणारे. पक्षपातविरहीतची निष्पक्ष पत्रकारिता.लिखाणामूळे अनेक प्रश्न तडीस लागले.सहकारक्षेत्राच्या सखोल जाणिवेची पत्रकारिता करताना राज्यभरात स्वतःचा वाचक वर्ग निर्माण करणारे पत्रकार ज्ञानेश्वर खुळे हे आहेत.अकोले टाईम्सचे सर्व वाचक,प्रेक्षक ग्राहक,हितचिंतक,जाहिरातदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांसाठी लवकरच सुरु करीत आहोत आम्ही विविध विषयांची लेखमाला.